साकोली,दि.16ः- नागझिरा वन्यजीव अभयारण्यात हंगामी वनमजूर म्हणून २00७ ते २0११ मध्ये कामावर असलेल्या २१ मजुरांना वन्यजीव विभागाकडून २0११ मध्ये कमी करण्यात आले. त्यामुळे वनमजुरांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. भंडारा कामगार न्यायालयाने सदर मजुरांना कामावर रुजू करण्याचे आदेश दिल्यानंतरही वनविभागाचे अधिकारी सदर वनमजुरांना कामावर घेत नसल्यामुळे या वनमजुरांनी जि. प. सदस्य डॉ. नेपाल रंगारी व वनकामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज रामटेके यांच्या नेतृत्वात बुधवारपासून (दि.१५) वन्यजीव कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली होती.त्यातच आज सकाळपासून 21 मजुरांचे कुटुंबही आंदोलनात सहभागी झाल्याने वन्यजीव विभागासमोर पेच निर्माण झाला होता.या आंदोलनाची माहिती मिळताच भंडारा गोंदियाचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी सायकांळी आंदोलनस्थळी पोचून मजुरांसह त्यांच्या कुटुबांचे म्हणने एैकून घेतले.त्यानंतर खा.पटोले यांनी वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करुन तत्काळ त्यांना कामावर घेण्यासंबधीचे निर्देश दिले.त्यानंतर मजुरांसह कुटुंबातील सदस्यांना निंबू पाणी पाजून कालपासून सुरु असलेले हे आंदोलन खा.पटोलेंच्या पुढाकारामूळे मागे घेण्यात आले.या उपोषण आंदोलनात २१ पुरूष, २१ महिला व ९ मुले सहभागी झाले होते.





