28.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ विष पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

विष पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

0
31

भंडारा,दि.23ः- धानपिकाचे उत्पन्न कमी आल्याने कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याने शेतातच विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी भंडारा तालुक्यातील माडगी (टेकेपार) येथे उघडकीस आली.रमेश परसराम भांडारकर (४0) रा. माडगी (टेकेपार) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. रमेशकडे तीन एकर शेती आहे. शेतीसाठी मागील दोन वर्षात घेतलेल्या कर्जामुळे तो चिंतेत होता. याशिवाय यंदा धान पिकाला उतारा मिळाला नाही. तीन एकरात त्याला पुरेल एवढेही उत्पन्न झाले नव्हते. घटनेच्या दिवशी त्याने पत्नीला बाजारात जाण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही मुलांना मी येतो, असे म्हणून बाहेर निघालेला रमेश पुन्हा परतलाच नाही. घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना मिळाताच घटनेचा पंचनामा करण्यात आला. जि. प. सभापती नरेश डहारे, जि. प. सदस्य निलकंठ कायते यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास ठाणेदार किचक यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

blank