40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News झिंगानूर येथे माओवाद्यांनी फलक झळकावले

झिंगानूर येथे माओवाद्यांनी फलक झळकावले

0
29

blank

आलापल्ली ,दि. २५ : पीपल्स गुरीला आर्मी लिबरेशन या नक्षल शाखेचा १७ वा वर्धापन दिवस २ डिसेंबरला आहे. त्याच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे माओवाद्यांनी फलक झळकावले.
सदर फलकामधे २ डिसेम्बर हा दिवस उत्साहात साजरा करण्यासोबतच युवक-युवतींनी, बुद्धिजीविंनी चळवळीत सहभागी व्हावे आणि ग्रीन हंटसारख्या पोलीस अभियानाला निरस्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात नक्षलयांनी परत डोके वर काढले असून पोलीस असल्याच्या नावाखाली निरागस आदिवासींचे हत्यासत्र सुरु केले आहे. त्यातच काल कोटगुल येथे नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूरुंगस्फोटात १ जवान शाहिद झाला. वारंवार नक्षलवाद्यांनी विविध घटनामधून आपला उपद्रव दाखवायला सुरुवात केल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

blank