कामगार दिनानिमीत्त जनजागृती कार्यक्रम

0
13

गोंदिया,दि.२५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व एस.टी.बस आगार तसेच जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने कामगार दिनानिमित्त एस.टी.बस आगार येथील कामगार वर्ग तसेच अधिकारी व कर्मचारी, कामगार वर्ग कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.एस.जरुदे होत्या. आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले, कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, सहायक वाहतूक अधिकारी संजना पटले, सामाजिक कार्यकर्ते नेतराम पारधी उपस्थित होते.
न्या.जरुदे म्हणाल्या, कामगारांचे हित जोपासण्यासाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना आहेत. कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी अनेक कायदे आहेत. एखादा कामगार कामावर जातांना दुर्घटना झाली तर अशा पिडितांना किंवा त्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही संबंधीत मालकाची आहे. कामगारांकरीता अनेक कायदे अस्तित्वात आहेत. शिकाऊ उमेदवार कायदा, व्यावसायीक प्रगती करणे, कर्मचारी राज्यविमा कायदा, मातृत्व कायदा, वेतन कायदा, सेवानिवृत्त वेतन कायदा इत्यादी कायदे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.इंगोले यांनी १४ वर्षाखालील मुलांना कामावर घेणे हा कायदयाने गुन्हा आहे. कामगारांसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी चांगल्या सुविधांचा व योजनांची कामगारांना माहिती असणे गरजेचे आहे असे सांगितले.
श्री.झाडे म्हणाले, कोणताही सरकारी कर्मचारी असो की खाजगी कामगार असो त्यामध्ये कामगारांमुळेच काम चालतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कायदयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कामगाराला सर्व सुविधा पुरविणे प्रशासनाचे काम आहे. यावेळी श्रीमती पटले यांनी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आर.जी.बोरीकर, जी.सी.ठवकर, दि.अ.थोरात, एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, ए.जे.नंदेश्वर, रविंद्र बडगे, गुरुदयाल जैतवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड.शबाना अंसारी यांनी केले.