25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठानामुळे सर्व आदिवासींमध्ये एकी : डॉ.मसराम

सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठानामुळे सर्व आदिवासींमध्ये एकी : डॉ.मसराम

0
39
सडक अर्जुनी ,दि.01 :    आपण आपल्या सांस्कृतिक धार्मिक मान्यता व्यक्त न केल्यामुळे परकीय धर्मांनी अतिक्रमण केले .तरी या देशातील मुळ निवासी आदिवासी समुदायातील परंपरागत  सांस्कृतिक धार्मिक मान्यता अद्यापही कायम आहेत.सांस्कृतिक धार्मिक  अधिष्ठानामुळे सर्व आदिवासीमध्ये एकी असल्याचे  प्रतिपादन गोंडवाना विदर्भ  राज्य संकल्पनेचे प्रणेते डॉ निरंजन मसराम यांनी व्यक्त केले.
घाटबोरी कोहळी येथे आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवाना  शाखा  घाटबोरी कोहळीच्या वतीने आदिवासी अस्मिता भगवान बिरसा मुंडा जयंती व आदिवासी गोवारी शहिद स्मारक उद्घाटन तसेच तालुका स्तरीय आदिवासी गोवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  आदिवासी गोवारी समाजाचे नेते वासुदेवराव नेवारे (भंडारा ) हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ.भा.नारायणसिंह ऊईके संघर्ष समितीचे अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष प्रा.वामनराव शेडमाके , आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाचे अध्यक्ष क्रिष्णा शेरू सर्पा, आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाचे संयोजक दामोदर नेवारे, आदिवासी आघाडी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, गोंडवाना संग्राम परिषदेचे महासचिव बाळकृष्ण गेडाम, राजाभाऊ ठाकरे (यवतमाळ), अ.भा.गोंडवाना पार्टीचे गोंदिया  जिल्हाध्यक्ष दिलीप ऊईके, जेष्ठ नेते डि.एम.राऊत, मुन्ना  वरकडे बकीटोला, हरिश्चंद्र ऊईके, प्रकाश भोंडे पांढरी, इंदल वाघाडे कोयलारी,माजी सरपंच नागोसे , पुतळी,  आदिवासी गोवारी मिशन देवरीचे सचिव रामेश्वर वाघाडे गुरूजी आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ.निरंजन मसराम पुढे म्हणाले, अवघ्या २५ वर्षात भगवान बिरसा मुंडा यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. खर्‍या अर्थाने देशाभिमान व स्वाभिमानाची शिकवण भारतीय समाजाला दिली. जल, जंगल आणि जमीनच्या आंदोलनामुळे भगवान बिरसा मुंडा आज आदिवासींचे आराध्य दैवत ठरले आहेत. आदिवासी गोवारी जमातीच्या लोकांनी झाले गेले विसरून न जाता त्यापासुन बोध घ्यावा. आदिवासी गोवारी जमातीच्या संघर्षाच्या वाटचालीत सोबत असल्याचे सांगत नव्या जोमाने निर्णायक भुमिका ठरवा, असे स्पष्ट मत डॉ निरंजन मसराम यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी क्रिष्णा शेरू सर्पा, लक्ष्मीकांत  धानगाये, प्रा.वामणराव शेडमाके, व कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव नेवारे भंडारा यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाच्या प्रारंभी परंपरागत डफरी वाद्यं वाजवत पाहुण्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.स्मारकाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते पार पडले.यावेळी भगवान बिरसा मुंडा तथा गोंड वनातील क्रांती वीर नारायणसिंह ऊईके यांच्या प्रतिमांचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.गोवारी हत्याकांडात  शहिद ११४ वीर  बांधवांना सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली  अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक दामोदर नेवारे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष परसराम राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मिशनचे सचिव रामेश्वर वाघाडे गुरूजी यांनी केले.      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डि एम.सोनवणे, स्वागताध्यक्ष एस.बी.भोंडे, उपाध्यक्ष मधुकर काळसर्पे, सचिव विश्वनाथ राऊत,सहसचिव देवचंद नागोसे, व आनंदराव नेवारे, अभिमन सोनवणे, मनिराम राऊत, मनोहर नेवारे, राजीराम भोंडे, देशराज राऊत, केवळराम भोंडे, ग्यानीराम सोनवणे, भाऊराव राऊत, होमराज सोनवाने, निमराव राऊत  आणि गावकरी व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सामुहिक सहभोजन आयोजित करण्यात आला होता. रात्री ‘तुटल्या तारा प्रितीच्या’ या संगित नाट्यप्रयोग सादर करण्यात आला . नाटकाचे उद्घाटक पाहुणे म्हणून रूपेश चामलाटे (ब्रम्हपुरी) तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्यानी गजानन कोहळे (चंद्रपूर) हे होते. रंगमंच पुजक म्हणून देवराम पाटिल लंजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर नेवारे व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती स्वागताध्यक्ष एन.बी.भोंडे व डि.एम.सोनवाने यांनी  यांनी दिली.