25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Featured News सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक पटलेंचा सत्कार

सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक पटलेंचा सत्कार

0
35

गोरेगाव,दि.०१ः- येथील पी.डी.रहागंडाले हायस्कुलचे वरिष्ठ लिपीक एस.बी.पटले यांचा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.पी.येळे होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामहिता शिक्षण संस्थेचे सचिव एॅड.टी.बी.कटरे,प्राचार्य एच.डी.कावळे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी उपस्थित होते.यावेळी वरिष्ठ लिपीक पटले यांनी शाळा व संस्थेच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल सपत्नीक शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन ए.एच.कटरे यांनी केले तर आभार सौ.एस.यु.बारापात्रे यांनी मानले.यशस्वतीसाठी एच.टी.बिसेन,जी.डब्लू.रहागंडाले,आर.वाय.कटरे,वाय.के.चौधरी,डी.एन.टेंभरे,एम.बी.येळेकर,लांजेवार यांनी सहकार्य केले.