आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडण्यासाठी राज्य समन्वय समिती स्थापन

0
8
आरोग्य विभागातील २२ कर्मचारी संघटना एकत्रित
नांदेड, दि.०१ः- :- वारंवार पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत नसल्यामुळे व प्रलंबित मागण्या मान्य करुन घेण्यासाठी राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटनाचा एकञित मेळावा घेऊन सर्व संघटनानी एकञीत येत आरोग्य कर्मचाऱ्यांची राज्य समन्वय समिती स्थापन केली आहे.आता या सर्व संघटना एकञितपणे शासकीय निमशासकीय आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समितीच्या मार्गदर्शनात शासनाकडे हक्कासाठी लढा उभारणार आहेत.नुंबईच्या बैठकित समन्वय समितीचे मुख्य समन्वयक  म्हणुन अशोक जयसिंगपुरे तर राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून सत्यजीत टिप्रेसवार (नांदेड ) यांची निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्रातील आरोग्य सेवेतील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने शासनाकडे  कर्मचाऱ्यांच्या  विविध प्रश्न मांडले. पण शासन  काहीही प्रतिसाद देत नव्हते.या सर्व बाबी पाहुन अशोक जयसिंगपुरे यांनी सर्व आरोग्य कर्मचारी संघटनाशी चर्चाकरुन एकञीकरणासाठी पाठपुरावा केला.त्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बैठक ठेवली.या बैठकित सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकञित येत राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.यावेळी अशोक जयसिंगपुरे यांनी एकञीकरणा मागील भूमिका मांडली तर प्रास्ताविक दिलीप उटाणे यांनी केले.गेल्या दहा वर्षापासुन शासनाकडे मागण्या करुन ही यश येत नसल्यामुळे सर्व कर्मचारी संघटना एकञीपणे आंदोलन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या नागपुर अधिवेशनात मोर्चा काढण्याचा ठराव मान्य करुन समन्वय समितीने मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकिला जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अरुण खरमाटे ,हिवताप कर्मचारी संघटनेचे बाजीराव कांबळे,हिवताप कर्मचारी संघटनेचे  दामोदर पवार, कॉस्ट्राईब संघटनेचे एस टी गायकवाड,बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेचे काकासाहेब वाघमारे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे  बजरंग कदम, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे नागनाथ दमकोंडवार परीचारीका संघटनेचे सुरेखा आंधळे,महानगर पालीका नर्सेसचे अमोलिक ज्योती, प्रविण चकुले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या संघटना आल्या एका छताखाली
जिल्हा परीषद कर्मचारी संघटना, हिवताप कर्मचारी संघटना,हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटना ,बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना  परिचारिका संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा वै ज्ञानिक अधिकारी कर्मचारी संघटना, महानगर नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना , राष्ट्रीय आरोग्य अभियान संघटना, कृष्ठरोग कर्मचारी संघटना,  क्षयरोग कर्मचारी संघटना भारतीय नर्सेस व आरोग्य कर्मचारी शक्ती संघटन….. या व आदी इतर संघटनाचे  प्रतिनिधी हे राज्य निमंञक म्हणून कार्य करतील,असा ठराव घेण्यात आला.
राज्यातील अजून काही आरोग्य विभागाच्या कर्मचारी संघटनेशी एकत्रीत करण्यासाठी चर्चा करण्याचे सर्वाधिकार अशोक जयसिंगपुरे यांना देण्यात आले.”आरोग्य विभागात प्रत्येक संवर्गाची स्वतंत्र संघटना असल्याने शक्ती विखूरली जात होती. म्हणून हा एेक्याचा नारा दिला आहे. एकीच्या बळातून प्रश्न सुटतील. शासन व्यवस्थेकडून मागण्या मान्य करून घेण्याचा विडा राज्य समन्वय समितीने उचलला आहे.” अरूण खरमाटे, निमंत्रक, राज्य समन्वय समिती
जर शासनाने मागण्या बाबत काही सकारात्मक निर्णय घेतला नाही तर एप्रील महिन्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी हे संपावर जातील. अशोक जयसिंगपुरे,मुख्य समन्वयक  शासकिय निमशासकिय आरोग्य कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र
यावेळी दादाराव माचेवाड नांदेड, महेंद्र वाघमारे जालना, चंद्रभान धोंडगे नांदेड, हसीना शेख, पुनम धनवटे, वैशाली पगार नाशिक, बालाजी कल्हाळे नांदेड, संजय उपरे सोलापूर, प्रमोद इंगळे यवतमाळ, राजेंद्र बैरागी नाशिक, आशिष कोल्हे नागपूर, अनंत सावळे यवतमाळ, बळीराम दुधारे हिंगोली, पुरुषोत्तम शेणमारे यवतमाळ, शिवाजी सुर्यवंशी हिंगोली, मयुर साडेगावकर जालना, दत्ता सुरनर लातूर, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अविनाश बागल, गंगाधर कोंके, प्रशांत कांबळे रत्नागिरी, सुनिल भोसले सातारा, अमोल खैरनार रायगड, व्ही.पी.कांबळे सोलापूर, समीर शेख, विनोद सोनकुसरे गडचिरोली श्रीकांत अहिरे, दिपक देवरे नाशिक आदीसह राज्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर होते.