33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र १६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

१६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

0
15

blank

नागपूर,दि.7 : नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होतील. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदान-प्रदान होऊन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग तयार होईल.यूपीएल समूह हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने आयोजित केला आहे.१६ डिसेंबर रोजी येथील सुरेश भट सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात संगीत, कला, नृत्याची मेजवानी असेल. पण याहून महत्त्वाचे म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल. यासाठी आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडिया, आयसीएआर- सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे सहकार्य लाभले आहे.
विदर्भ, महाराष्ट्रासह पंजाब, आंध्र प्रदेश, मणिपूर आदी राज्यांसह इस्रायल, टर्कीमधूनही संत्रा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी होतील. संत्र्याचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी यावर ते आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन लाभ घेण्याची ही एक संधी चालून आली आहे. संत्रा उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. तर देशात संत्रा उत्पादनात नागपूरचे अव्वल आहे. संत्रा उत्पदानाच्या मोहिमेत नागपूर नेतृत्व करून भारताला जगात पहिल्या क्रमांकावर पोहचवू शकते. नागपुरी संत्रा भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावे यासाठी ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचा हा प्रयत्न आहे.

blank