24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ सात वर्षापासून बांधर्‍याचे काम अपूर्ण

सात वर्षापासून बांधर्‍याचे काम अपूर्ण

0
20

चिमूर,दि.08ः- तालुक्यातील नेरी येथून जवळ असलेल्या नवतळा येथील शेतकरी सन २0१0 पासून सिंचनापासून वंचित आहेत. या परिसरातील सर्व्हे न. ३१५ (कोटगाव) येथील शेतीला लागून असलेल्या नाल्याला बंधारा मंजूर झाला व बांधकाम पण झाले परंतु मागील ७ वषार्पासून या बांधर्‍याचे काम अपूर्ण आहे. या बंधार्‍याला पाणी अडविण्यासाठी अजून पयर्ंत गेट आले नाही तर तेव्हापासून बांधलेला बंधारा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे त्याला तळे, भेगा पडलेल्या आहेत.
सदर बाब अशी की, नवतळा येथील शेतकर्‍याच्या मागणीनुसार सिंचनासाठी सर्वे नं. ३१५ (कोटगाव) परिसरातील शेतीच्या बाजूने जाणार्‍या नाल्याला बंधारा बांधून शेतीला पाणी पुरविण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. आणि या मागणीला २0१0 मध्ये या बंधार्‍याचा कामाला सुरुवात झाली. परंतु ज्या कंत्राटदाराला काम दिले त्या कंत्राटदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. व काम अर्धवट करून पडून गेला त्या नंतर दुसर्‍या कंत्राटदाराला काम सोपविण्यात आले. या कंत्राटदारांनी काम पूर्ण झाले म्हणून संपूर्ण पैशाची उचल केली. पण परंतु तेव्हापासून आजपयर्ंत बंधारा झाला पण पाणी अडविण्यासाठी गेट आलेच नाही. आणि या कामाला १ वर्ष पूर्ण होण्याआधीच बंधार्‍याला भेगा पडल्या. या संदर्भात संबंधित विभागाला तक्रारी देऊनही अजूनपयर्ंत कोणतीही कारवाही झाली नाही. त्यामुळे या हलगर्जी पणामुळे जवळपास ५0 एकर जमीन सिंचनापासून वंचित आहे. मात्र प्रशासन याबाबत संबंधित विभाग निद्रावस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
त्यामुळे शेतकर्‍यांचा विचार करून तरी प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन जातीने लक्ष देऊन बांधर्‍याचे काम पूर्ण करावे अशी मागणी ना. वि. चौधरी व शेतकरी वर्गांनी केलेली आहे.

blank