25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home महाराष्ट्र सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊन शेतकऱ्याने संपवले आयुष्य

सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊन शेतकऱ्याने संपवले आयुष्य

0
20

अकोला,दि.08- राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊनही प्रश्न न सोडवल्याने कर्जबाजारी शेतकर्‍याने आयुष्‍य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात ही घटना घडली आहे. ज्ञानेश्वर मिसाळ असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचे 2.5 लाख, मुथूट फायनान्सचे 1.5 लाख कर्ज होते.दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे तरुण शेतकर्‍याची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.