नोकर कपात धोरणाचा कर्मचाèयांनी नोंदवला निषेध

0
12

गोंदिया,दि.१३-राज्यशासनाने राज्यातील सुमारे ५ लाख कर्मचारी व अधिकारी यांची पदे गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या.महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा अध्यक्ष विश्वास काटकर,चंद्रहास चुटे,आशिष रामटेके,लिलाधर पाथोडे,शैलेष बैस,विरेंद्र कटरे,एल.यु. खोब्रागडे, ए‘.सी.चुèहे, प्रशांत पाठक, अजय खरवडे,संतोष तुरकर,सुभाष खत्री, सुलभा खाडे, मनोज दिक्षीत, प्रा.ज्योतीक ढाले, नरेंद्र रामटेक्कर, लिलाधर जसूजा आदी उपस्थित होेते.
यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाèयांना निवेदन दिले.निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून जुलैमधील संपाच्या पाश्र्वभूमीवर राज्यशासन व कर्मचारी संघटना यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार मान्य करण्यात आलेल्या मागण्यांबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.
काळ्या फिती लावून कामकाज राज्य शासनाच्या नोकर कपात धोरणाविषयी जिल्हा परिषद कर्मचाèयांनी निषेध नोंदविला. जिल्हा परिषद मधील सर्व विभागप्रमुख व त्यांच्या अधिनस्थ कर्मचाèयांनी आज दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. दरम्यान भोजन अवकाशाच्यावेळी सर्वांनी एकत्र येवून राज्य शासनाचा कळकळीत निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रलंबित सोळ्या मागण्यांचे निवेदन दिले.