24.4 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ गोेरेगाव नगर पंचायतीची उपसंचालकाने केली स्तृती

गोेरेगाव नगर पंचायतीची उपसंचालकाने केली स्तृती

0
24

गोरेगाव,दि.१३: येथील नगर परिषदेला नगरविकास विभागाचे उपसंचालक सुनील लहाने यांनी भेट देवून नवनिर्मित नगर पंचायतीच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच विविध योजनांचा आढावा घेऊन ग्रामविकासासाठी नगरविकास विभाग पाहिजे तेवढे सहकार्य करेल असे आश्वासन देत नगर पंचायतीच्यावतीने राबविण्यात येत आसलेल्या विविध उपक्रमांची स्तृती केली.
यावेळी नगराध्यक्ष सीमा कटरे, उपाध्यक्ष आशिष बारेवार, मुख्याधिकारी संदीप चिद्ववार, बांधकाम सभापती शामली जायस्वाल, पाणी पुरवठा सभापती हिरणबाई झंझाड, महिला बाल कल्याण सभापती शोभा लटये, नगरसेवक रqवद्र चन्ने, मधूमाला साखरे, निमावती धपाडे, राजू टेंभुर्णीकर, चंद्रलेखा कांबळे, हिरालाल रहांगडाले, सुरेश रहांगडाले, हेमेंद्र बिसेन, भुमेश्वर येल्ले, सयाबाई मारबदे, मलेशाम येरोला, सुरेश पटले उपस्थित होते.

blank