24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home राजकीय विधानसभेत सत्तापक्षाचे आमदारच गैरहजर

विधानसभेत सत्तापक्षाचे आमदारच गैरहजर

0
24

नागपूर,दि.14 – हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची उपस्थिती कमी असल्याने भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात तंबी देणारे पत्र काल दिले आहे. मात्र तरी आजही विधानसभा सभागृहात सत्तापक्षाच्या आमदारांची संख्या कमीच आहे. सत्ताधारी सभागृहाला गांभीर्याने घेत नाही, असा आरोप विरोधकांनी काल केला होता. यावर आमचा पक्ष शिस्तप्रिय आहे, त्यामुळे शा प्रकारचे पत्र आम्ही नेहमीच देत असतो, ही तंबी नाही, असे उत्तर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.