41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ बसस्थानक व आठवडी बाजारात वाॅटरकूलरचे लोकार्पण

बसस्थानक व आठवडी बाजारात वाॅटरकूलरचे लोकार्पण

0
18

blank

गोरेगाव,दि.4ःः गोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने आठवडी बाजार परिसरातील नागरिकांसह बसस्थानकावरील प्रवाशांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेत्तून नगरपंचायतीच्या अध्यक्षा सीमा राहुलजी कटरे यांच्या शुभहस्ते येथील बस थांबा व आठवडी बाजारात प्याऊ( RO फिल्टर व वॉटर कूलर) चे लोकार्पण करण्यात आले.तसेच 14व्या वित्त आयोग निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या 17 विधंन विहीर(बोरेवेल) चे देखील लोकार्पण करण्यात आले.यासोबतच दलिततोर योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी नगरपंचयातचे उपाध्यक्ष आशिष बारेवार,मुख्याधिकारी संदिप चिद्दरवार पाणीपुरवठा सभापती श्रीमती झंझाड, माजी पाणीपुरवठा सभापती रवींद्र चन्ने,विरोधीपक्ष नेते  हिरालालजी रहागंडाले,श्रीमती साखरे,नगरसेवक सुरेश रहांगडाले,रेवेंद्र बिसेन,डाॅ.रुस्तुम येडे, येल्लेजी आदी मान्यवर उपस्थित होते.

blank