39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ फेगडकरला अटक

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ फेगडकरला अटक

0
28

भंडारा,दि.11ः- जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ वर्ग दोन डॉ लक्ष्मण फेगडकर यांना ४ हजार रुपयाची लाच घेताना भंडारा एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. मोतियाबिंदूचे ऑपरेशन करण्याकरिता रुग्णाला ६ हजार ची लाच मागितली होती.भंडारा येथील रहिवासी मोतियाबिंदूचे ऑपरेशन करविण्याकरिता भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात कार्यरत नेत्ररोग तज्ञ डॉ. लक्ष्मण फेगडकर यांना भेटले असता तात्काळ मोतियाबिंदूचे ऑपरेशन करण्याकरिता त्यांना नेत्ररोगतज्ञांनी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर मागणीच्या विरुद्ध तक्रारदार यांनी कायदेशीर कारवाई करण्याकरिता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार नोंदवली. नोंद करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंध विभाग भंडारा यांनी सापळा रचून कारवाई केली असता नेत्ररोग तज्ञ डॉ लक्ष्मण फेगडकर यांनी लाच मागितल्याचे तसेच तडजोड करून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाले. यावरून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम ७,१३(१)(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. सदर कारवाई श्री पी. आर पाटील पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनकर सावरकर यांच्या चमूने पार पाडली.

blank