23.8 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Top News समुद्रात बोट उलटली, 40 विद्यार्थी बेपत्ता; बचावकार्य सुरु

समुद्रात बोट उलटली, 40 विद्यार्थी बेपत्ता; बचावकार्य सुरु

0
35

मुंबई,दि.13(वृत्तसंस्था)- पालघरमधील डहाणू येथे समुद्रात बोट उलटली असून 40 विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. बोटीत के.एल.पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी होते. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून बचावकार्य सुरु करण्‍यात आले आहे.सूत्रांनुसार, पालघर जिल्ह्यातील के.एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल समुद्रावर गेली होती. 40 विद्यार्थ्यांना घेऊन डहाणूच्या समुद्रात एक बोट गेली. मात्र, अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली.