24 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ आपले सरकार व महा ई-सेवा केंद्राला दरपत्रक लावणे बंधणकारक

आपले सरकार व महा ई-सेवा केंद्राला दरपत्रक लावणे बंधणकारक

0
40

गोंदिया,दि.16 : 18 जानेवारीपासून प्रत्येक आपले सरकार व महा ई-सेवा केंद्राच्या दर्शनी भागात आपल्या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधांचे दरपत्रक लावावे. केंद्राच्या माध्यमातून आधार नोंदणीकरण व 5 ते 15 वयोगटातील बायोमेट्रीक अद्ययावतीकरण करण्याचे काम नि:शुल्क करण्यात यावे. इतर बायोमेट्रीक अद्ययावतीकरण करणे यासाठी 25 रुपये शुल्क, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी अद्ययावतीकरण करण्यासाठी 25 रुपये शुल्क, आधार क्रमांक शोधणे व त्याची प्रिंट देणे (ब्लॅक ॲन्ड व्हाईट) यासाठी 10 रुपये शुल्क व आधार क्रमांक शोधणे व प्रिंट देणे (कलर) यासाठी 15 रुपये शुल्क आकारण्यात यावे. याबाबतचे दरपत्रक केंद्राच्या दर्शनी भागात ग्राहकांना दिसेल असे लावावे. नागरिकांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण केल्यानंतर नोंदवहीमध्ये केंद्रचालकाने नोंद घ्यावी. सदर नोंदवहीची तपासणी कोणत्याहीवेळी जिल्हा आय.टी.सेलच्या चमुद्वारे करण्यात येईल. दरपत्रकात नमूद केलेल्या दराच्या अतिरिक्त रक्कम घेतांना आढळून आल्यास त्या केंद्रचालकावर दंडात्मक स्वरुपात कार्यवाही करण्यात येवून सदर केंद्रचालकाला काळ्या यादीत टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी. आधार संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास आय.टी.सेलच्या विशाल बागडदे (9579120250) यांच्या भ्रमणध्वनीवर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर करावी.