40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home Top News काँग्रेसचे १५ जि प सदस्यच करणार मतदान,शेखर पटले रुग्णालयात

काँग्रेसचे १५ जि प सदस्यच करणार मतदान,शेखर पटले रुग्णालयात

0
20

गोंदिया,दि.२९-:गोंदिया जिल्हा परिषदेच्या उद्या मंगळवार ३० जानेवारीला होऊ घातलेल्या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत काँगेसच्या १६ सदस्यापैकी १५ सदस्यच मतदानात सहभाग नोंदविण्याची स्थिती उदभवली आहे.काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले हे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीनंतर लगेच तिसर्या दिवशी पुन्हा इतर सदस्यासोंबत सहलीसाठी मुबंईला रवाना झाले होते.दरम्यान या काळात त्यांची प्रकृती चांगलीच खालावल्याने त्यांना मुबंईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या सात दिवसापासून पटले यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी बेरार टाईम्सला दिली.पटले हे सभापती पदासाठी दावेदार मानले जात असतानाच अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने उपचार घेत आहेत.त्यांच्यासोबत त्यांचे कुटूंबिय असून आमदार गोपालदास अग्रवाल हे जातीने त्यांच्या उपचाराकडे लक्ष देत असल्याची माहिती आहे.