हळदी कुंकवात सुद्धा नाभिक शक्ती आहे- अनिता चन्ने

0
19

देवरी,दि.29- महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे हे एक संस्कार आहे. या संस्कारातच नाभिक समाजातील महिलांची एकजूटतेची खरी शक्ती दिसून येते. या शक्तीमुळेच छोटी मुले भविष्यातील उत्तम पिढीचे कार्यकर्ते महिलांच्या हातून नक्कीच घडतील, असे प्रतिपादन नाभिक समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता चन्ने यांनी केले आहे.

देवरी येथे नाभिक समाज देवरी तालुका शाखेच्या वतीने गेल्या 24 तारखेला आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांता बानक ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भिमेश्वरी उरकुडे, सिंधू बारसागडे, सुनीता बारसागडे, सेवंता उरकुडे, चंद्रकला लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते. सौ. चन्ने पुढे असेही म्हणाल्या की, महिलांप्रमाणे पुरुषांनी सुद्धा संत सेनाजी आणि नगाजी महाराजांच्या नावावर एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

प्रास्ताविक आणि संचलन शालू बारसागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सविता उरकुडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कंचन मेश्राम, किरण कावळे, मुन्नी लांजेवार, रंजू बानक, मीरा खडसिंगे, निला बारसागडे, उज्वला मौदेकर, सुनीता लांजेवार माधुरी खडसिंगे, शालू हटवार यांनी सहकार्य केले.