40.1 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता तणसीच्या ढिगावर नवजात जिवंत अर्भक आढळले

तणसीच्या ढिगावर नवजात जिवंत अर्भक आढळले

0
18

गोंदिया,दि.१२ः-तालुक्यातील सिरपूर परिसरातील शेतात ठेवलेल्या तणसीच्या ढिगावर नवजात जिवंत अर्भक आढळून आले. ही घटना ९ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता सुमारास उघडकीस आली.नवजात अर्भक अनैतिक संबंधातून जन्मलेला असावा, अशी शंका-कुशंका नागरिकांकडून निर्माण होत आहे. तालुक्यातील सिरपूर येथील जतपेले यांच्या शेतात जनावरांच्या चरण्यासाठी ठेवलेल्या तणसीच्या ढिगावर स्त्री अर्भक बेवारस अवस्थेत जिवंत आढळून आले. या घटनेची माहिती पोलिस पाटील महेंद्र घोडेस्वार यांनी रावणवाडी पोलिसांना दिली. यावेळी घटनास्थळी गावकèयांची चांगलीच गर्दी जमली. बदनामीच्या भीतीने आरोपींनी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला बेवारस अवस्थेत तणसीच्या ढिगावर सोडून पळ काढला असावा, अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन रावणवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा. उपनिरीक्षक शेख करीत आहेत.