तिडका येथे महाशिवरात्री पर्वावर कबड्डी स्पर्धेच आयोजन आजपासून

0
13

सडक अर्जुनी,दि.१२ः-जवळच्या तिडका येथे सार्वजनिक बाल गणेश मंडळाने खास महाशिवरात्री निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन तसेच शिवमंदीर कैलाश घाट येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ फेबु्रवारीला सकाळी ९ वाजता दीपप्रज्वलन व शिवअभिषेक कार्यक्रम तसेच दुपारी ११ वाजता कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी जि.प. सभापती अशोक लंजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वनिता भोयर, उपसरपंच गंगाधर सोनवाने व ग्रा.पं.चे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. कबड्डी स्पर्धेतील विजयी चमुला प्रथम पारितोषिक ७ हजार ७७७ रु., द्वितीय ५ हजार ५५५ रु. तर तृतीय पारितोषिक ३ हजार ३३३ रुपये ठेवण्यात आले आहे. रात्री ७.३० वाजता गुरूवर्य झाडीपट्टी नाट्यमंडळ वडसा सडक अर्जुनी द्वारा प्रस्तुत विस्कळटलेले घरट या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटकाचे उद्घाटन जि.प. सदस्य रमेश चुèहे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय लांजेवार, नगरसेवक देवचंद तरोणे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १३ फेबु्रवारी दुपारी १ वाजता गोपलकाला व महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशप्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, पं.स. सभापती गिरधारी हत्तीमारे, शेषराव गिèहेपुंजे, राजेश नंदागवळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बक्षिस वितरण सायंकाळी ५ वाजता अशोक लंजे, माजी जि.प. सदस्य मिलन राऊत, डॉ. बबन कावळे, नगरसेवक दिनेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक बालगणेश मंडळ व कैलाश घाट शिवसेवा समिती तिडकाच्या वतीने करण्यात आले आहे.