24.4 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ इंडियन कोब्राचा सर्पमित्राला दंश

इंडियन कोब्राचा सर्पमित्राला दंश

0
20
आमगाव,दि.२२ः- घरात शिरलेल्या सापाला पकडल्यावर जंगलात सोडण्यासाठी जात असलेल्या सर्पमित्राला सापाने दंश केल्याची घटना आमगाव येथे घडली. अजय गोकूळ शहारे (२६) असे सर्पमित्राचे नाव असून तो गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूशी झूंज देत आहे.
शहरातील रौनकनगर येथील असाटी यांच्या घरात भारती कोब्रा जातीचा साप लपून बसलेला आढळला. असाटी यांनी अजय शहारेला सापाला पकडण्यासाठी बोलावले. दरम्यान अजयने सापाला पकडले व प्लास्टीकच्या बॅगेत टाकून गावाशेजारील जंगलात सापाला सोडण्यासाठी जात असताना बॅगेच्या छिद्रातून साप बाहेर पडला व अजयला दंश केला. यात अजय जागीच खोली कोसळला. नागरिकांनी तात्काळ त्याच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.