ट्रॅक्टर चालक-मालक संघटन व शेतकरी संघटनाच्या संयुक्त विराच मोर्चा

0
21
देवरी,दि.२२ः- शासनाच्या १२ जानेवारी २०१८ ला काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या विरोधात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर ट्रॅक्टर चालक-माल संघटना व शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग होण्याचे आवाहन येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषद २१ फेबु्रवारी रोजी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत संघटनेचे देवरी तालुका अध्यक्ष विजय मडावी यांनी केले.
महाराष्ट्र सरकारच्या मनमर्जी धोरणाच्या विरोधात हा मोर्चा २२ फेबु्रवारी रोजी सकाळी ११ वाजता देवरी चिचगड रोडवरुन सुरु होऊन नेशनल हायवे होत उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे. यांच्या मागण्यामध्ये महाराष्ट्र सासनाचा १२ जानेवारी २०१८ चा जीआर रद्द करणे, ग्रामीण व शहरी भागातील वर्गीकरण करुन दंड आकारणे, गावकड्ढयांच्या घरबांधनीसाठी २ ब्रासच्या ठिकाणी २० ब्रास रेती काढणे, रेती, गिट्टी, बोल्डर, मुरुम, विटा आदी साहित्य वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना कमर्शीयल ट्रॅक्टर असावा ही अट रद्द करावी, २०१५-१६ ची दुष्काळाची मदत द्यावी, पीक विमा व २०१८-१८ ला दुष्काळ घोषित करा, सरसकट कर्ज माफी द्या. या पत्रकार परिषदेत संघटनेचे तालुका अधअयक्ष विजय मडावी, दीपक शर्मा, केवलराम फुंडे, सचिव मनोहर राऊत, कोरे, पुरुषोत्तम रहिले, भोजराज प्रजापती, अरविंद शेंडे, तिलक राऊत, अमोल गभणे आदी उपस्थित होते.