24.2 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home Featured News कनिष्ठ अभियंता फुंडकरने सादर केला जलसंकटावर प्रोजेक्ट

कनिष्ठ अभियंता फुंडकरने सादर केला जलसंकटावर प्रोजेक्ट

0
30

गोंदिया,दि.२३ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातंर्गत अर्जुनी मोरगाव उपविभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता मायकल फुंडकर यांनी जलसंकटावर मातकरण्यासाठी सोकपिट तयार करण्याबाबतचा आपला प्रोजेक्ट जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविला आहे.२२ फेबुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार योजनेच्या आढावाबैठकीत फुंडकर यांनी भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता पावसाचे पाणी अडवून ते कसे साचविता येईल यावर आधारित सोकपिट बनविण्याबाबतची संकल्पना त्यांनी सादर केली आहे.त्यासोबतच त्याचे लाभही सांगितले आहे.त्यामध्ये लुप्त झालेले लहान मोठ्या नाले यामुळे जलमग्न होणार,या नाल्याच्या परिसरातील जिवजंतू,वनस्पती वर्षभर जिवित राहणार,परिसरातील विहिर,qवधनविहीरांना भरपूर पाण्याचे स्त्रोत उपलब्ध होणार,भुगर्भातील पाण्याचा साठा व पातळी उंचावण्यात मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.फुंडकर यांनी यासाठी मुकाअ एम राजा दयानिधी, लपा विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वकर्मा तसेच उपविभागीय अभियंता यांचे मार्गदर्शन असल्याचे म्हटले आहे.