31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचनाकरीता निधीची अर्थमंत्र्याकडे मागणी

गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचनाकरीता निधीची अर्थमंत्र्याकडे मागणी

0
22

गडचिरोली,दि.२७(अशोक दुर्गम)ः-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकèयांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.आमदार होळी यांनी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन तसेच रखडलेले सिंचन प्रकल्पाना मंजुरी,नादुरुस्त कोल्हापूरी बंधारे,गावतलावाची कामे करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडे यावर्षात अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावे या मागणीसाठी अर्थमंत्री मुनगंटीवार यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपा माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे,मधुकर भांडेकर उपस्थित होते.