24.3 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ कापूस गठाणीने भरल्या ट्रकला आग ; लाखोंचा माल जळून खाक

कापूस गठाणीने भरल्या ट्रकला आग ; लाखोंचा माल जळून खाक

0
21

महामार्गावरील वाहतूक एक तासापासून होती ठप्प

वर्धा,दि.27 – नागपूर – वर्धा मार्गावरील सेलूच्या यशवंत चौकात जुवाडी येथून नागपूरला कापसाच्या गठाणी घेऊन जाणारा ट्रक पेटल्याने मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. या ट्रकला आग कशाने लागली हे अद्यापी गुलदस्त्यात असून आग विजविण्यासाठी वर्धा नगर पालिकेचा अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला आहे. यात लाखोचे नुकसान झाले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच सेलूचे पोलिस दाखल झाले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.