25.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home Top News गट्टा बाजारात पोलिस जवानावर नक्सल्याकड़ूंन चाकुहल्ला

गट्टा बाजारात पोलिस जवानावर नक्सल्याकड़ूंन चाकुहल्ला

0
30

गडचिरोली,दि.04: एटापल्ली तालुक्यांतर्गत येत असलेल्या जांबीया गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या गट्टा आठवडी बाजारात बंदोबस्तात असलेल्या पोलीस जवानावर नक्षल्यांनी चाकू ने हल्ला करुन जखमी केल्याची घटना आज, ४ मार्च रोजी घडली. डोंगी मट्टामी, पोलिस नाइक असे जखमी पोलीस जवानाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, गट्टा येथे आज, आठवडी बाजार भरलेला होता. दरम्यान येथे बंदोबस्तासाठी इतर पोलीस जवानांसोबत डोंगी मट्टामी हा पोलीस जवान बंदोबस्त करीत होता. दरम्यान आठवडी बाजारात एका नक्षल्याने जीवे मारण्याच्या इराद्याने डोंगी मट्टामी याचेवर बंदूक उगारली. मात्र बंदूकीमध्ये बिघाड झाल्याने नक्षलीने चाकुच्या सहाय्याने जवानावर हल्ला केला. यात डोंगी मट्टामी हा पोलीस जवान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरीता हेलिकाॅप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे. पुढील तपास जांबीय गट्टा पोलीस करीत आहेत.