26.6 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ आमगावखुर्दच्या साखळी उपोषणात महिलांचा सहभाग

आमगावखुर्दच्या साखळी उपोषणात महिलांचा सहभाग

0
33

सालेकसा,दि.07 : जोपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश होत नाही, तोपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेत आमगाव खुर्दवासीयांनी साखळी  उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषण आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. या उपोषणाला माजी आमदार रामरतन राऊत, सहषराम कोरोेटे यांच्यासह अनेकांनी भेट देत पाqठबा दिला आहे. मात्र या आंदोलनाला भाजप आमदारांचा विरोध दिसून येत आहे. सातव्या दिवशी या आंदोलनात महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये विमल बी.कटरे, अनिता सु. चुटे, जयबाई स.डोये, लिलाबाई ब.शेंडे, शशी र. फुंडे, वाय.जी.साखरे, नंदा वि. वशिष्ट, मंजु सु. मेंढे, शोभा र. पाथोडे, कौशल्या स. कठाने, शुभांगी बी.डोये, वंदना डोये, सुरेखा इळपाते, रीता रा. दोनोडे, विद्या पाथोडे, ममता प्र. चुटे, दिपाली बारसे, प्रेमलता बन्सोड, अनुसया सोनवाने यांचा समावेश होता. या आंदोलनात नगर विकास मंचचे मनोज डोये, राजू दोनोडे, बबलू कटरे आदि सहभागी झाले आहेत.