30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षल्यांनी बांधले बॅनर

अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षल्यांनी बांधले बॅनर

0
47

गडचिरोली,दि. ७: कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षल्यांनी पत्रके टाकून बॅनर बांधल्याचे आज दिसून आले. या बॅनरवर जागतिक महिला दिनानिमित्त संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले असून, सरकार जातीयवादी असल्याची टीका करण्यात आली आहे.

नक्षल्यांच्या क्रांतिकारी आदिवासी महिला संघटन-दंडकारण्य, या संघटनेने ही पत्रके टाकली आहेत. महिलांवर ब्राम्हणीय हिंदू लोक अत्याचार करीत आहेत. मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारच्या सांप्रदायिक नीतीचा विरोध करा, असा मजकूर पत्रके व बॅनरवर लिहिलेला आहे. ५ मार्चच्या पहाटे नक्षल्यांनी कोरची-पकनाभट्टी रस्त्यावर बॅनर लावून त्याखाली पेरुन ठेवलेल्या प्रेशर बॉम्बचा स्फोट झाल्याने दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. त्यानंतर आज अंतरगाव-पुराडा रस्त्यावर पत्रके व बॅनर आढळून आले. यावरुन कुरखेडा व कोरची भागाकडे नक्षल्यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.