29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News अकोल्याचा डॉक्टरासह 3 सहकाऱ्यांचा यमुना एक्सप्रेसवर अपघाती मृत्यू

अकोल्याचा डॉक्टरासह 3 सहकाऱ्यांचा यमुना एक्सप्रेसवर अपघाती मृत्यू

0
22

blank

मथुरा(वृत्तसंस्था),दि.18 – दिल्ली-आग्रा मार्गावरील यमुना एक्सप्रेस वे वर आज रविवारी सकाळी मथुरा येथे झालेल्या भीषण अपघातात 3 डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 4 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात माइल स्टेशन 88 जवळ झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वच डॉक्टर ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) चे होते असे सांगितले जात आहे. या अपघातातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील अकोला येथील डॉक्टर हर्षद वानखेडे यांचाही समावेश आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली ते आग्राच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये 7 लोक प्रवास करत होते. त्याचवेळी ही कार मागून एका कंटेनरमध्ये घुसली. या अपघातात महाराष्ट्रातील डॉक्टर हर्षद (35), हरियाणातील हेमबाला (25) आणि चंदीगडचे यशप्रीत (26) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोबतच जीतेंद्र (एमपी), महेश (बिहार), अभिनव आणि त्रिपुराच्या केफमिन जखमी आहेत.हे सगळेच नोएडा ते आग्रा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी जात होते.

blank