क्षेञात सर्वांगिण विकासाचा झंझावात कायम ठेवणार-जि.प.सदस्या प्रणाली ठाकरे

0
14
लाखांदुर ,दि.१९:- क्षेत्रातील प्रत्येक गावाचा सर्वागीण विकास करण्यास आपण सदैव कटिबद्ध असून, मागिल दोन वर्षांपासून क्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून आपण विकास कामे पुर्ण केली आहे. रस्ते, नाल्या यासारख्या पायाभुत सोयीसुविधांसह समाजातील सामान्य मानसापर्यत आवश्यक योंजना पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील अाहोत. आजमितीस अर्ध्याहुन अधिक कामे पुर्ण झाली असून वेगाने चालू असलेला विकासाचा झंझावात असाच कायम ठेवणार. असे मत जि.प.सदस्या प्रणाली ठाकरे यांनी केले. त्या डांभेविरली येथे सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे भुमिपुजनाप्रसंगी बोलत होत्या.
तालुक्यातील डांभेविरली येथे (ता.१८) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दहा लक्ष रूपयाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी पं.स.उपसभापती शिवाजी देशकर, प्रा.पि.एम.ठाकरे, सरपंच सुमंत रामटेके, उपसरपंच जयेश मांढरे, दामोधर बुराडे, ग्रा.पं.सदस्य जयमुनी रामटेके, योगीता बुराडे, शिल्पा बुराडे, आसाराम बुराडे, हरीदास खोब्रागडे, कवळु प्रधान व आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाल्या की, सुरवातीला जेव्हा आपण क्षेत्रात फिरलो तेव्हा येथील रस्त्यांची दुरवस्था पाहुन आपण कस काय येवढा सारा विकास करणार या भितीने जणू आभाळच कोसळल्यागत वाटु लागल होत. माञ जनतेनी भरभरून दिलेल्या प्रेमाच ऋण फेडण्याकरीता आपण सर्वांगिन विकासाचा ध्यास मनी बाळगून पाऊल उचलले आणि क्षेत्रातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्यातुन विकास कामास सुरवात केली आहे. याबरोबरच शासनाद्वारे अनेक कल्याणकारी योंजना सुरू करण्यात आल्या असून, क्षेञातील जनतेनी लाभ घ्यावा. अशाही त्या म्हणाल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं.शिपाई दिपक भागडकर, पा.पु.कर्मचारी धनराज वकेकार यांनी परिश्रम घेतले.