25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ अंभोरा येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

अंभोरा येथील रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
20

गोंदिया,दि.१९ : तालुक्यातील ग्राम अंभोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, रस्त्यांच्या माध्यमातूनच कोणत्याही क्षेत्राची प्रगती होते. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत शासनाचा निधी खर्च झाल्यास त्याचा लाभ मिळतो. आता आम्ही बाघ प्रकल्पाच्या कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. यानंतर परिसरातील शेतकरी वर्ष भर शेती पिकवून आपले जीवन अत्मनिर्भरतेने व्यतीत करू शकणार असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्तावीक वाय.पी.रहांगडाले यांनी मांडले.
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. याप्रसंगी चमन बिसेन, विजय लोणारे, प्रकाश् डहाट, रमेश लिल्हारे, चिंतामन चौधरी, माधुरी चौधरी, लक्ष्मी रामटेके, अरविंद चव्हाण, चित्रकला कटरे, जयेश रामटेके, गेंदलाल शरणागत, लिलावंती चिखलोंडे, टेकचंद सिहारे, ईश्वर पटले, गौरीशंकर डहाट, देवकन बिसेन, अनिता पटले, सितारा दमाहे, आशा कुंभरे, प्रेमचंद बिसेन, बाबुलाल कटरे, मोरेश्वरी टेंभरे, निरंजना डोंगरे यांच्यासह कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.

blank