42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय न.प. उपाध्यक्षपदी आशिष गोंडाणे अविरोध

न.प. उपाध्यक्षपदी आशिष गोंडाणे अविरोध

0
23

blank

भंडारा,दि.21ः-भंडारा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आशिष गोंडाणे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षाकरीता करण्यात आली आहे.रुबी चढ्ढा यांच्या राजीनाम्यामामुळे पालिकेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदासाठी मंगळवारी नगर परिषद सभागृहात निवडणूक घेण्यात आली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सुनील साखरकर तर भाजपकडून आशिष गोंडाणे यांनी अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्याच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील साखरकर यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे आशिष गोंडाणे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ही निवड एक वर्षाकरिता राहणार आहे. यावेळी नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ढेरे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

blank