24.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home गुन्हेवार्ता लाखनी येथे बेपत्ता झालेल्या तरुणीचा 4 दिवसांनंतर आढळला मृतदेह

लाखनी येथे बेपत्ता झालेल्या तरुणीचा 4 दिवसांनंतर आढळला मृतदेह

0
35

लाखनी,दि.21 : बेपत्ता झालेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोशनी देशमुख असे मृत तरुणीचे नाव आहे. सौंदड येथील रहिवासी असलेले रोशनी 17 मार्चला कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. यानंतर बुधवारी (21 मार्च) सकाळी लाखनी पंचायत समितीसमोरील एका घरामध्ये तिची मृतदेह आढळून आला. हे घर राधेशाम क्षीरसागर यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या घरात एक मुलगा भाडोत्री म्हणून रहात होता. या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. घर उघडून पाहिले असता तिथे रोशनी देशमुखचा मृतदेह आढळून आला.  दरम्यान, या घटनेची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. रोशनी ही बेपत्ता असल्याची तक्रार डुग्गीपार पोलीसात कुटुंबियानी नोंदविली होती.