जि.प.अभियंता आंदोलनांला जि.प.अध्यक्षासंह एडी.सीईओंची भेट

0
13

गोंदिया,दि.21: जिल्हा परिषदेत कार्यरत असणाèया अभियंता अभियंता संवर्गाच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने राज्यभरातील अभियंत्यांनी दि.१९ व २० मार्चला राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलनाचे आवाहन केले होते.त्या अंतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर दोन दिवसीय धरणे आंदोलन केले.या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,लपाचे कार्य.अभियंता विश्वकर्मा यांनी पहिल्या दिवशी भेट दिली.तर २० मार्चला आंदोलनाच्या दुसर्या दिवशी जि.प.अध्यक्षा सीमा मडावी,शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,अति.मुख्य कार्यकारी अधिाकरी प्रभाकर गावडे ,शरद क्षत्रिय,श्री खालसा यांनी मंडपाला भेट देऊन आंदोलक अभियंत्याशी चर्चा केली.जि.प.अध्यक्ष व अति.मुकाअ यांनी निवेदन स्विकारत शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलकांकडे पाठ फिरवली.
अभियंता संवर्गाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमधील सर्व अभियंते १९ व २० मार्चला सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती गोंदिया जिल्हा अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि. गोवर्धन बिसेन, विभागीय सचिव इंजि.वासुदेव रामटेककर यांनी दिली.
या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अभियंते सहभागी झाले होते.त्यामध्ये संघटनेचे सचिव विजय ढोमणे,कोषाध्यक्ष विजय धारकर, इंजि.दिनेश कापगते, देवेंद्र निमकर, दिलीप ठवकर, यादवराव चौधरी, इंजि.दिलीप देशमुख, अंकित अग्रवाल, मंयक माधवानी, आशिष कटरे, सचदेवे, उमेश बिसेन, चंद्रशेखर अगडे, शशिकांत काळे, पी.के.पटले, इंजि.प्रीती माकोडे, सुधा रहागंडाले, दिपाली साखरे, विद्या राणे, स्वाती कटरे, संदिप पवार, श्रीरंग तिरेले, इंजि. देविलाल पटले,धवल सोमलवार, इंजि. दामोदर वाघमारे, इंजि. हेमंत निमजे,प्रदिप रहागंडाले,मायकल फुंडकर,विकास देशपांडे आदीसह दुसर्या दिवशी बांधकाम,लपा व पाणीपुरवठा विभागातील 49 अभियंते आंदोलनात सहभागी झाले होते.