24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home राजकीय आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही; एकनाथ खडसे

आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही; एकनाथ खडसे

0
24

मुंबई,दि.23-भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी आपल्याच सरकारवर ‘आपल्याला बोलू दिले जात नाही’ असा आरोप केला. आपण खरेदी केलेल्या भोसरीतील भूखंडासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाईंंनी सभागृहात चुकीची माहिती दिली. त्यासंदर्भात त्यांच्यावर दाखल हक्कभंगावर आपल्याला म्हणणे मांडण्यासंदर्भात वेळ दिला जात नाही, अशी खंत त्यांनी विधानसभेत व्यक्त केली.

प्रश्नोत्तरांच्या तासानंतर खडसे यांनी हक्कभंगाचा विषय उपस्थित केला. तसेच ‘आपल्याला म्हणणे मांडण्यासाठी वेळ कधी मिळणार’ अशी अध्यक्षांना विचारणा केली. खडसंेंना पाठिंबा देण्यासाठी लागलीच विरोधी बाकावरचे सदस्य सरसावले. व त्यांनीही हक्कभंग हे आयुध सरकार मोडीत काढत असल्याचा आरोप केला.सभागृहा कार्यक्रमपत्रिकेत दररोज हक्कभंग सूचनांचा क्रम दिलेला असतो, मग तो मांडण्यास सदस्यांना वेळ का दिली जात नाही, अशी विचारणा राष्ट्रवादीच्या वळसे -पाटील यांनी केला. हक्कभंग मांडण्यासंदर्भात सभागृहाने काही नियम बदलले काय, असा प्रश्न अजित पवार यांनी केला.