25.4 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home Top News अनंतनागमध्ये लष्कराने मारले 3 दहशतवादी

अनंतनागमध्ये लष्कराने मारले 3 दहशतवादी

0
25

श्रीनगर(वृत्तसंस्था)दि.24 – जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले. यातील एक हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर होता. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. ही चकमक शुक्रवारी रात्रीपासून सुरु होती. शनिवारी सकाळी कारवाई संपल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी अनंतनागमधील एका भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते.या दरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुरक्ष रक्षकांनी प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत शनिवारी सकाळी दोन दहशतवादी मारले गेले. यातील एक हिजबूलचा कमांडर अश्रफ मौलवी होता.