25.1 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home गुन्हेवार्ता कोटगूल येथे नक्षली ताब्यात,पिस्टल व रिमोट जप्त

कोटगूल येथे नक्षली ताब्यात,पिस्टल व रिमोट जप्त

0
27

गडचिरोली,दि.२४ : : कोरची तालुक्यांतील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोटगूल येथील बाजारातून एका नक्षल्यास अटक करण्यात आली आहे. या अटक करण्यात आलेल्या नक्षलाचे नाव चंदू उर्फ बारीक दालसू हिचामी वय (२१) रा. मलीनगगट्टा ता. एटापल्ली असे असल्याचे पोलीसांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. गुप्त माहितीच्या आधारावर हा सापळा रचून ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्राने मोठी कामगिरी केली आहे.त्याच्याजवळून एक पिस्टल व रिमोट जप्त करण्यात आले. चंदू उर्फ बारीक दालसू हिचामी हा नक्षली कोणत्या नक्षल दलमचा आहे, याची माहिती अद्यापर्यंत प्राप्त झाली नाही. सदर नक्षली एखादा घातपात करण्याच्या उद्देशाने आला होता का? या दिशेने ग्यारापत्ती पोलीस विभाग तपास करीत असून त्याची अधिक चैकशी केली जात आहे.