23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home Top News भाजपचे जि.प.सदस्य कोंड्रा यांची माओवाद्यांनी केली हत्या

भाजपचे जि.प.सदस्य कोंड्रा यांची माओवाद्यांनी केली हत्या

0
27

गडचिरीलो,दि.27 :-महाराष्ट्राच्या सीमेपासून पाच किलोमीटरवरील छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम गावात सोमवारच्या राञी आठ वाजेच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश कोंड्रा आपल्या मिञासोबत घरासमोर बसून असताना पाच माओवाघांनी घेराव करून कु-हाड व चाकुने हल्ला करीत त्यांची हत्या केल्याची घटना घडली.यात ते  गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हयातील सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान रात्रीला त्यांचा मृत्यू झाला.जगदीश कोंड्रा हे आठ वर्षा अगोदर कंञाटदाराचे काम करीत असताना माओवाघांनी धमकी दिली असता कंञाटदाराचे काम सोडले होते.कोंड्रा यांच्या मागे दोन मुली, पत्नी असा कुटुंब आहे.