33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ कातुर्लीत ६४० मजुराच्या हाताला काम

कातुर्लीत ६४० मजुराच्या हाताला काम

0
25

blank

आमगाव,दि.०८ः-आमगाव पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कातुर्ली येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत पांदण रस्त्याच्या कामावार ६४० मजुरांना काम मिळाले आहे. त्यामुळे कामासाठी होणारे मजुरांचे स्थलातंर थांबविण्यात ग्रामपंचायतील यश आले आहे.दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नियमित काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे ग्रामपंचायतीचे सचिव कमलेश बिसेन व सरपंच केशरीचंद बिसेन यांनी रस्ता भूमिपूजन प्रसंगी सांगितले.भूमिपूजनप्रसंगी सरपंच केशरीचंद बिसेन, सचिव कमलेश बिसेन,ग्रापं सदस्य चुंनीजी सहारे,भागवत बिसेन,बंडू दोनोडे,अर्पण रामटेके,प्रीती कोरे,श्रीमती भेलावे,श्रीमती जाईटवर,श्रीमती फरकुंडे,रोजगार सेवक नित्यमन,आपरेटर हिरालाल,परिचर भेलावे आदी उपस्थित होते.

blank