कॅशलेसच्या नावावर रामाणी मोटर्समध्ये ग्राहकांची लुबाडणुक

0
9

ग्राहकांने की अर्थमंत्रालयाकडे तक्रार
गोंदिया,दि.०८-देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापुर्वी नोटबंदीच्या घोषणेसोबतच कॅशलेस व्यवहारावर भर देण्याचे जाहिर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने व राज्यसरकारनेही कॅशलेस व्यवहार राबविण्यासाठी व्यापारीसह इतरांना सुचना दिल्या.त्यातच गोंदियातील रामाणी मोटर्स येथे सुध्दा कॅशलेस व्यवहार सुरु करण्यात आले.परंतु याठिकाणी कॅशलेस व्यवहार करतांनाच अधिकचे २ टक्के रक्कम चार्जेस म्हणून ग्राहकांकडून वसुल करुन लुट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणात संबधित ग्राहक कमलेश बिसेन यांनी अर्थमंत्रालयाकडे रामाणी मोटर्सकडून केली जात असलेल्या लुटीबद्दल ऑनलाईन तक्रार सुध्दा नोंदविली आहे.
रामाणी मोटर्स गोंदिया येथे कॅशलेस व्यवहारावर २% चार्जेस घेऊन ग्राहकांची केली जाते खुली लूट .तक्रारदार बिसेन यांच्यानुसार आधी तर कॅशलेसस्वरुपात पेमेंट घ्यायला रामाणी मोटर्सचे कर्मचारी तयार नव्हते.त्यांना वारंवार विनंती केल्यावर त्यांनी होकार दिला,मात्र त्याचे शुल्क म्हणून देय रक्कमेच्या २ टक्के रक्कम अधिक घेतली.वास्तविक कॅशलेस व्यवहारात अशी अधिकची रक्कम घेता येत नसताना रामाणी मोटर्सने शासकीय नियमांना तिलांजली दिली असून अशाप्रकारे याठिकाणी कित्येकांची लुबाडणूक झाली असावी हा विषय सुध्दा समोर आला असून शासनातर्फे केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.