पेट्रोल-डिझेल दरवाढीविरूद्ध काँग्रेसचा साकोलीत निषेध मोर्चा

0
9

साकोली,दि.08 : जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपने सत्ता काबीज केली व सत्ता येताच महागाई वाढविली. या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. जनतेवरील हा अन्याय दूर झाला पाहिजे व वाढलेली महागाई कमी झाली पाहिजे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच साहित्यावर त्याचा परिणाम होत असून या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने शनिवारला निषेध मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसचा हा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध मोर्चा तालुका काँग्रेस कमेटीच्या कार्यालयातून राष्ट्रीय महामार्गाने जात सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा करीत साकोली तहसील कार्यालयात पोहचला. तहसीलदार अरविंद हिंगे यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनानुसार, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यामध्ये तीव्र असंतोष उफाळून आलेला आहे. त्यामुळे या दरवाढीचा तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमेटी, भाजप सरकारचा निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.
तहसीलदारांना निवेदन देतेवेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, शहर अध्यक्ष अश्विन नशिने, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती रेखा वासनिक, महिला अध्यक्ष छाया पटले, मार्कंडराव भेंडारकर, महासचिव दिलीप मासूरकर, दिनेश खोटेले, उमेश कठाणे, विनायक देशमुख, उमेश भुरे, ओम गायकवाड, मनोहर डोंगरे, भेजराम फुलबांधे, अण्णा समरीत, डॉ.अजय तुमसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू समरीत, सुनिता कापगते, नरेश करंजेकर, हेमंत भारद्वाज, निर्मला कापगते, दिपक रामटेके, जितेंद्र मेश्राम, अनिल किरणापुरे, विजय साखरे यांच्यासह साकोली तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.