
साकोली,दि.29ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची येत्या 28 मे रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात ओबीसी,शेतकरी,युवकांच्या प्रश्नांना घेऊन निवडणुक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.संकटमोचन शेतकरी संघटना,ओबीसी संघर्ष कृती समितीसह इतर सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांनी भंडारा जिल्ह्यात कार्य सुरु ठेवले आहे.शेतकरी हितासाठी तसेच धानाला भाव मिळावे,बोनस,दुष्काळी परिस्थीतीवरील प्रश्नाला घेऊन आंदोलनात्मक भूमिका सुध्दा त्यानी घेतली आहे.काँग्रेस पक्षाकडे हा मतदारसंघ आल्यास काँग्रेसने उमेदवारी दिल्यास आधी काँग्रेसला प्राधान्य देऊ मात्र काँग्रेसला न मिळाल्यासही आपण पोटनिवडणुक लढण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यामुळे तुमसरे यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण तर राष्ट्रवादीसाठीही संधीचा लाभ होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.





