गोंदियाच्या पानलाईनमध्ये भीषण आग,दुकाने खाक

0
7

गोंदिया,दि.30ः- येथील शकंरगल्लीकडे असलेल्या भाजीबाजारातील पानलाईनला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.ही आग कशामुळे लागली याचा अद्यापही उलगडा झाला नसून सकाळपासूनच आग विझविण्यासाठी गोंदिया नगरपरिषद,अदानी व भंडारा येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षापुर्वी याच परिसरातील होटल बिंदल प्लाझामध्ये आग लागली होती.आता त्याचपरिसरातील भाजी बाजारात आग लागली आहे.यापुर्वी 10 वर्षापुर्वी सुध्दा याच भाजीबाजारात आग लागून दुकाने राख झाली होती.आग आटोक्यात आली असून घटनास्थळाचा पाहणी अग्निशमन दल,पोलीस विभाग व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सुरवात केली आहे.