24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीच्यावतीने लोकसभा निवडणुकीवर बैठका

राष्ट्रवादीच्यावतीने लोकसभा निवडणुकीवर बैठका

0
33

गोंदिया,दि.2: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात होऊ घातलेल्या पोट निवडणुकीविषयी कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्याकरिता बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, नरेश माहेश्वरी, लक्ष्मणराव चंद्रीकापुरे, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर आदि पदाधिकारी विविध गावात जावून निवडणुकीवर मंथन करीत आहेत. पांढराबोडी येथे योगराज लिल्हारे यांच्या निवासस्थानी  त्याचप्रमाणे सडक अर्जुनी येथे तालुका राष्ट्रवादीच्या बैठकीत विजय शिवणकर, किशोर तरोणे, छाया चव्हाण, रमेश चुèहे, अविनाश काशिवार आqदच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. तर गोंदिया येथील रेलटोली स्थित कार्यालयात युवक काँग्रेस व विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाèयांसोबत चर्चा करण्यात आली.