24.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home राजकीय पंकजा मुंडेना मोठा धक्का, मानलेला भाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करणार

पंकजा मुंडेना मोठा धक्का, मानलेला भाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करणार

0
31

लातूर(विशेष प्रतिनिधी)दि.2- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना विधानपरिषद निवडणुकीपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या गेल्या ११ वर्षांपासून मुंडे गटाचे खंदे समर्थक असलेले रमेश कराड उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. रमेश कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. रमेश कराड आज राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतील.

उस्मानाबाद लातूर बीडचे विधानपरिषदेचे आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ संपतो आहे. ही जागा तीन टर्म देशमुख यांनी अबाधित ठेवली होती. मात्र नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी त्यांनी ही जागा सोडली. रमेश कराड हे याच जागेसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार असल्याचे समजते आहे. पंकजा मुंडे यांच्या शिवाय रमेश कराड यांचे भाजपातील कोणाशीही जवळचे संबंध नाही. याचाच फायदा घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजांना शह देण्यासाठी कराड यांना संधी दिली. रमेश कराड हे पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक होते. एका वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.