25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय शेतकऱ्यांच्या मुलांना हातामध्ये तलवार घेण्याची वेळ आणू नका -आमदार बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या मुलांना हातामध्ये तलवार घेण्याची वेळ आणू नका -आमदार बच्चू कडू

0
21

आर्णी,दि.23-‘एकीकडे देशाचा पोशिंदा सततच्या नापीकीने हवालदिल असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना जाहीरपणे शिव्या देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना हातात तलवार घेण्याची वेळ आणू नका, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. सत्ताधाऱ्यांना बदलवण्यासाठी आसूड यात्रेचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आल्याचेही आमदार बच्चू कडू यांनी या वेळी सांगितले. आर्णी तालुक्यातील दाभडी येथून सोमवारी सुरू करण्यात आलेल्या आसूड यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.blankवेळी मंचावर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, प्रहार कार्याध्यक्ष बल्लू जंजाळ, पांढरकवडा नगराध्यक्ष वैशाली नहाते, अतुल खुपसले, जिल्हाध्यक्ष विलास पवार, नितीन मिर्झापुरे, आशिष तुपटकर, आदीनाथ महाराज, दिगांबर गुल्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. सोमवारी २१ मे रोजी दाभडी येथून या आसूड यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. ही आसूड यात्रेचा दि. २५ मे रोजी भोकरदन येथे समारोप होणार आहे.