24.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News मुलचेऱ्यात नक्षल्यांनी एफडीसीएमच्या लाकडांसह दस्तऐवज जाळले

मुलचेऱ्यात नक्षल्यांनी एफडीसीएमच्या लाकडांसह दस्तऐवज जाळले

0
22

गडचिरोली, दि.२४: सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री मुलचेरा येथील वनविकास महामंडळाच्या आगारातील लाकडांना आग लावून वनविभागाच्या नाक्यावरील दस्तऐवजांची जाळपोळ केली. यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.आज मध्यरात्री काही सशस्त्र नक्षलवादी मुलचेरा येथील वनविभागाच्या नाक्यावर गेले. त्यांनी चौकीदारास झोपेतून उठवून तेथील महत्वाच्या दस्तऐवजांना आग लावली. त्यानंतर जवळच असलेल्या वनविकास महामंडळाच्या आगारातील लाकडांना आग लावली. या आगीत सागवानासह अन्य प्रजातींची शेकडो लाकडे जळून राख झाली. यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.