40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय मुख्यमंत्री फडणवीस यांची आज अर्जुनी/मोरगाव आणि गोंदिया येथे जाहीर सभा

मुख्यमंत्री फडणवीस यांची आज अर्जुनी/मोरगाव आणि गोंदिया येथे जाहीर सभा

0
32

गोंदिया,दि.२४ :  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत(तानुभाऊ) पटले यांचा निवडणूक प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि. २५) अर्जुनी/मोरगाव आणि गोंदिया येथे येत असून जाहीर सभेतून विशाल जनसमूहाला संबोधित करतील.त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते सायंकाळी ५ वाजता अर्जुनी/मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात आणि सायंकाळी ७ वाजता गोंदिया येथील कोतवाल मैदान, बी. जे. हॉस्पिटलच्या समोर, गणेश नगर येथे विशाल जनसमूहाला संबोधित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत आणि सभेसाठी कार्यकर्ता मोठ्या उत्साहाने तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार ऐकण्यासाठी जनसामान्यांमध्ये  उत्साहाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बंडोले,  आमदार अनिल सोले, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले,  आमदार संजय पुराम, माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, माजी आमदार केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, भेरसिंग नागपुरे, हरीश मोरे, रमेश कुथे, गोंदिया  विधानसभा प्रमुख विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, न प उपाध्यक्ष शिव शर्मा आदी पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.