25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता शुभम लोणारकरचा मृतदेह हस्तगत

शुभम लोणारकरचा मृतदेह हस्तगत

0
24
गोंदिया,दि.24 : कुडवा परिसरातील वैभव लॉन येथून अपहरण झालेल्या शुभम लोणारकरचा मृतदेह पोलिसांनी मंगळवारी (ता.२२) रात्री बालाघाट जिल्ह्यातील धिरसोली नदीपात्रातून हस्तगत केला आहे.
माताटोली येथील शुभम लोणारकर हा १० मे रोजी वैभव लॉन येथे कॅटरर्सच्या कामावर गेला होता. यावेळी काही जणांनी त्याला सही करायची आहे, असे म्हणून घेऊन गेले. तेव्हापासून शुभम बेपत्ता होता. याची तक्रार शुभमची आई रेखा लोणारकर यांनी रामनगर पोलिसांत नोंदविली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौकशी सुरू केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्याकडे सोपविण्यात आला होता. काही पथके गठित करण्यात आले होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात शोध मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू केली असता. यापैकी काही आरोपींनी पोलिसांना म़ृतदेह बालाघाट जिल्ह्यातील धिरसोली नदीच्या पात्रात वाळूमध्ये पुरल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस आरोपींना सोबत घेऊन मंगळवारी रात्री घटनास्थळावर पोचले. ज्याठिकाणी शुभ‘चा मृतदेह पुरण्यात आला होता त्याठिकाणी पोत्यात असलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील सखोल तपास करण्यात येत असून यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.